बारामती न्यूज|
ओबीसी (OBC) समाजाच्या वाट्याच आरक्षण कोणालाही घेऊ दिले जाणार नाही, या आरक्षणावर कोणालाही नजर फिरू दिली जाणार नाही, ओबीसी वर्ग हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा ओबीसी बांधवांनी बारामतीत शुक्रवारी (ता. 5) रोजी दिला. तसेच जरांगे पाटील यांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तत्यावाबद्दल गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशीही मागणी या मोर्चादरम्यान ओबीसी नेत्यांनी केली.
शासनाने काढलेल्या मराठा आरक्षण जीआर विरुद्ध बारामतीत मोर्चा काढून आपली भूमिका मांडण्याचा निर्णय ओबीसी बांधवांनी हाती घेतला होता. त्या नुसार शुक्रवारी ता. 5 सप्टेंबर पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली असतानाही ओबीसी बांधवांचा शांततामय एल्गार मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर प्रशासकीय भवनाच्या समोर विविध ओबीसी बांधवांनी नाराजगी दाखवत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे.
मराठा समाजाला आरक्षणाला ओबीसी बांधवांचा विरोध नाही पण जर, ओबीसींच्या कोट्यातील आरक्षण दिले तर त्याला आम्ही तीव्र विरोध करणार, अशी भूमिका सर्वच ओबीसी नेत्यांनी मांडली. या ओबीसी समाजबांधवांच्या मोर्चामध्ये सर्वपक्षीय भूमिका बाजूला सारुन एकजूटीने ओबीसी नेते सहभागी झाल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळाल. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसींच्या कोट्यातून जर तो देण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरुन त्याचा तीव्र विरोध कळेल, आणि सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. मोरच्यादर्म्यान प्रा. लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका मांडली आहे.