महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या जीआर मुद्द्यावरून राजकीय वाद सुरूच आहे, भुजबळसह ओबीसी नेते जीआर चा निषेध करत आहेत. अश्यातच नवीन वाद निर्माण होताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जारागे पाटील मागणीनुसार ओबीसी कुणबी प्रमाणपत्र निर्णयानंतर, आता मराठा क्रांती मोर्चाने नवीन मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे उपोषण केले होते पाचव्या दिवशी त्यांना यश मिळालं. यानंतर राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटियर लागू करून जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली. त्यानंतर आता मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, एकीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असताना दुसरी मागणी समोर धडकली, पण आता मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्यास मराठा क्रांती मोर्चाने तीव्र विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच मराठा म्हणून आरक्षण मिळावे यासाठी ठाम भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली हाती घेतली आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. “मराठा क्रांती मोर्चा” राज्याचे समन्वयक, सुनील नागणे यांनी नुकतंच पत्रकारांशी बोलताना. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा उल्लेख न कारता त्यांच्यावर अशी टीका करून भावना व्यक्त केली आहे.
पुढे म्हणाले, राजकीय पक्ष आणि समाजातील काही व्यक्ती जाणूनबुजून मराठा समाजाला संभ्रमात ठेवण्याचे काम करत आहेत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी केला. ओबीसी कुणबी प्रमाणपत्र कधीही रद्द होऊ शकते. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण देणे योग्यच नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना आरक्षण द्या आमचां कुठलाही विरोध नाही. मात्र, ज्यांच्या जुन्या नोंदींमध्ये मराठा असा स्पष्ट उल्लेख आहे. अश्याना आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, मात्र जीआर मध्ये ज्यांचा केवळ कुणबी म्हणून नोंद आहेत त्यांनाच फायदेशीर आहे. मराठा म्हणून नोंद असलेल्यांना त्याचा फायदा होणार नाही असा आरोप केला. म्हणून आमची लढाई आम्ही लढू मराठा म्हणूनच ओबीसीमधून आरक्षण घेऊ, या विधानामुळे समाजात दोन गट पडण्याची शक्यता आहे.