राज्यात लाखोच्या संख्येने मराठा समजा मुंबई मध्ये धडकल्यानंतर त्यापाठोपाठ आता ओबीसीही मुंबई मध्ये धडकणार आल्याचे म्हटलं. छगन भुजबळांनी ओबीसी नेत्याची बैठक घेत रणनीती आखली आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी नेत्याची रणनीती काय असणार जाणून घेऊयात.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपसमितीने मनोज जरागे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला (जीआर) हा ओबीसी समाजावर अन्यायकारक असल्याचा मत भुजबळासह ओबीसी नेत्यांचा आहे.
उपोषणाला-उपोषणाने उत्तर देऊ, ओबीसीमध्ये वाटेकरी नको, अशी भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. जर आमच्यावर अन्याय झालाच तर आम्ही बोलणार, सरकारने सरकारचे बघून घ्याव, पण आता ठरवलंय, आम्ही उपोषण करणार जिल्हा-जिल्ह्यातून तालुका-तालुक्यातून तहसीलदार पासून कलेक्टरपर्यंत मोर्चे काढणार असल्याचे सरकारला ठणकावून सांगितले, ओबीसीच्या वाटेत दुसरे कोणीही वाटेकरी नको, आम्हाला एकच वाक्य पाहिजे. जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या संख्येने मुंबई मध्ये येणार असल्याचे अशी थेट भूमिका मंत्री भुजबळ यांनी घेतली आहे.