धक्कादायक! भुजबळना विचारून मराठा आरक्षणाचा जीआर काढला; महायुवतीला थेट इशारा

मुंबई|

कोणाचे ताटातील काढून कुणाला देणार नाही असे मुख्यमंत्री शब्द होते. मात्र, आता ओबीसी वर्गातून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी यात मोठा वाटा मिळणार आहे. त्यामुळे शासनाने एका तासात दोन (जीआर) काढलेच कसे, असा प्रश्न करत भुजबळांना विचारुन जीआर काढला असा गैरसमज पसरुवू नका. असा इशारा ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यांना दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण केले. सलग पाचव्या दिवशी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने जरांगे पाटील यांची आझाद मैदानात थेट भेट घेत मागण्या मान्य! करून (जीआर) काढणार असल्याचे सांगितल. लगेच एक (जीआर) काढला, मात्र त्या मध्ये पात्र व्यक्तींना असा उल्लेख होता. त्यावर जरांगे पाटील यांनी विरोध केला आणि पात्र शब्द वगळण्यास सांगितले. त्यानंतर लगेच  दुसरा (जीआर) काढला आणि पात्र शब्द वगळण्यात आला. जर चुकीचे असेल तर मी गप्प कसा बसणार असे म्हंटले..

एका वृत्तवाहिनीनूसार: ज्या वेळेला (जीआर) काढले, त्यावेळेस आम्ही वाचल्यानंतर समजले की, यामध्ये गडबड आहे. एक दिवस अगोदर मला मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते. तेथे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पण होते. आणि आता ते सांगतात की, आम्ही त्यांना सांगितले होते. मला असे सांगितले की, सरसकट शब्द काढला आणि हैदराबाद गॅझेट आपण लागू करण्याचे ठरवले आहेत. पुढे मग मी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख दाखवत सांगितले की, कुणबी आणि मराठा वेगळे आहेत. जे कुणबी आहेत, त्यांना द्यायला माझी कोणतीही हरकत नाही. पण छगन भुजबळ यांना विचारून जीआर काढला अशी दिशाभूल करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करून असा इशारा भुजबळ यांनी महायुतीला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *