मुंबई|
महाराष्ट्रात शासनाने काढलेला मराठा आरक्षण जीआर मुद्यावरून राज्यात राजकीय वाद निर्माण होत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी सरकारने काढलेला जीआर विरुद्ध नाराजगी वक्त करत टीका करण्यात आली. जीआर नुसार मराठा समाजाला तुम्ही दार उघडे केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हा जीआर ओबीसी समाजावर घाव घालणारा आहे.
शासनाने पहिल्या जीआरमध्ये पात्र हा शब्द असताना तो वगळून दुसऱ्या जीआरमधून काढून टाकण्यात आला आहे. यावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. विजय वडेट्टीवार यांनी याआधीही सरकारवर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही केला होता. दुसरीकडे, बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवारांना बाबनराव तायवाडे, यांचे मार्गदर्शन घेण्याचा असा सल्ला दिला आहे. तसेच काँग्रेस नेते बाबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले की, हा जीआर ओबीसी प्प्रवर्गाचां कोणतेही नुकसान करणारा नाही. वडेट्टीवार यांनी ८ सप्टेंबर रोजी मुंबईत ओबीसी नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षण जीआर विरुद्ध रणनीती ठरवण्याचा चित्र आहे.