मनोज जरंगे पाटील यांचं मुंबई आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे. आंदोलनाला राज्यभरातील समाज बांधव पाठिंबा देण्यासाठी मुंबई येथे येथे आहे.
या आंदोलकांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. मोठ्या प्रमाणात खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बॉटलचे ट्रक मुंबईत येत आहेत. अशातच आता मनसेकडूनही या आंदोलकांना अन्न पुरवठा केला जाणार आहे. तसे आदेश मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मराठा आरक्षणाचा निकाला जो लागायचा तो लागेल. तोपर्यंत या आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय करा, असं त्यांनी म्हटलं आहे
राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते, मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. जारंगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याभरातून लाखो मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, आता त्यांच्या राहण्याची आणि जेवण्याचं मोठं आव्हान निर्णय झालं आहे. आंदोलकांसाठी राज्यभरातून मदतीचा हात सुरु आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बॉटलचे ट्रक मुंबईत येत आहेत. अशातच, आता मनसेकडूनही या मराठा आंदोलकांना अन्न पुरवठा केला जाणार असल्याचे आदेश मनसेचे नेते, अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मराठा आरक्षणाचा निकाला जो लागायचा तो लागेल. तोपर्यंत या आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय करा, असं त्यांनी सोशल मीडिया वर एक पोस्ट केली की राज्यातून आलेले मराठा बांधवांना खाण्याची व राहण्याची सोय करा स्पष्ट म्हटलं आहे.