मुंबई: मराठा आरक्षण लढ्यात एक महत्वपूर्ण बातमी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले की त्यांचे सरकार कायदेशीर आणि संवैधानिक चौकटीत मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. त्यांनी सांगितले की गेल्या वर्षी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय श्रेणी अंतर्गत मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण अजूनही लागू आहे. ओबीसी कोट्याअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे अनिश्चित काळाचे उपोषण दुसऱ्या दिवशीही आझाद मैदान येथे सुरू आहे.
फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगार देण्याचे बहुतेक निर्णय २०१४ ते २०२५ दरम्यान घेण्यात आले होते हा तोच काळ आहे जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बहुतेक वेळा सत्तेत होती. मनोज जरांगे पाटील यांचे हजारो समर्थक दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात आणि आजूबाजूला तळ ठोकून आंदोलन करत आहेत, जिथे जरांगे पाटील यांनी पुन्हा त्यांचे आमरोन उपोषण, आंदोलन सुरू केले आहे. तसेच आंदोलनाबाबत सरकार सकारात्मक नसल्याच चिन्ह दिसत आहे.