राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने शासनाचा महत्त्वपूर्ण जीआर (शासकीय निर्णय) जारी केला. या शासन जीआरनुसार, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्रमाणपत्र कसं मिळावंच याची प्रक्रिया काय जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत.
कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुरावे, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रक्ताच्या नातेवाईकांचा (वडील, चुलते, आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा ई.) कुणबी जातीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. तसेच खालील पर्यायांद्वारे पुरावे गोळा करता येऊ शकतातः
शाळेच्या नोंदी पुरावे| आपल्या रक्ताच्या नातेवाईकाचा प्राथमिक शाळेतील प्रवेश उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला तपासा. त्यात कुणबी नोंद आहे का, तपासा
कोतवाल बुक/ गाव नमुना नं. 14| स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म-मृत्यू नोंद ह्या नोंदी कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. 14 मध्ये उपलब्ध असतात. तहसील कार्यालयात अर्ज करून याची नक्कल घेता येते.
सर्व्हिस बुक|जर नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असल्यास, त्यांच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावरील कुणबी जातीची नोंद आढल्यास, साक्षांकित उतारा म्हणून पुरावा वापरता येईल.
महसुली (शेती) कागदपत्रे| जुन्या महसुली व्यवहार वारस नोंदी (6 ड नोंदी), 7/12 उतारे, 8अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, क. ड. इ. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक यामध्ये कुणबी जातीचा उल्लेख
आधीचे प्रमाणपत्र |संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकाने यापूर्वी कुणबी जात प्रमाणपत्र मिळवले असल्यास, ते प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले पडताळणी प्रमाणपत्र असे पुरावा म्हणून चालेल.
नव्या जीआरनुसार|
नव्या जीआरनुसार, कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. जर वरील कोणताही पुरावा उपलब्ध नसेल, तर कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या गावातील/ कुळातील नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि वंशावळ समितीच्या चौकशीद्वारे प्रमाणपत्र मिळवता येणार, यासाठी गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही गठित समिती स्थानिक चौकशी पूर्ण करून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया 90 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करणार.