मुंबई: राज्यात पुन्हा मराठा आरक्षण मुदा पेटला आहे मराठा आरक्षण पुन्हा घरदीचे सर्व रेकॉर्ड मोडीत कडणार असल्याचं बोलल जात आहे. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जारांगे पाटील आज मुंबईत जाणार असल्याची शक्यता आहे. त्यापूर्वी आंदोलन काय दिशा घेते? कुठे वळण घेते हे देखील महत्वाचे..
यापूर्वी नेते लक्ष्मण हाके यांनी हलगी काय वाजवता? आमच्याकडे नगरा आहे नगरा असे जाणीव पूर्वक वक्तव्य केले होते. तसेच मराठा समाजाने नगारा काय असतो हे कालच्या गर्दीतून दाखवून दिले. मोर्चा गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता दिसत आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा समाज मुंबईत धडकणार आहे. आज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा रात्री उशीरा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राज्याच्या राजधानीत बड्या घडामोडी घडत आहेत.
मराठा मोर्चा 20 अटींचे हमीपत्र आणि पोलिसांचा इशारा : मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी दिली असली तरी त्यावर २० अटी शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यात आझाद मैदानात स्वयंपाक करण्यास मनाई, कचरा करण्यास बंदी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आंदोलन बेकायदेशीर ठरवण्याचा इशारा दिला आहे. तसेच आझाद मैदानात फक्त ५,००० आंदोलकांना परवानगी आहे. तरीही बाहेरून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे येत असल्याने परिस्थिती नियत्रनाबहेर जाण्याची शक्यता आहे. जरी फक्त एका दिवसाची परवानगी दिली असली तरी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ते उपोषणाला सुरुवात करतील. यामुळे सर्व राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
त्याचबरोबर मुंबईतील दादर स्टेशन परिसरात राजकीय बॅनरबाजी दिसून आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर “इतिहास शिव्यांना नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो” असा मजकूर आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारे फडणवीस असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजप नेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांच्या नावावर हे बॅनर लावले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. येथून पुढे आंदोलनकर्ते यश मिळणार काय? दिशा काय धरणार राजकीय वातावरण तापणार का? हे सर्व समोर येणार आहे.