मराठा समाजाला मोठ यश! मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य..

मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आझाद मैदान येथे सुरू असलेले आंदोलकांना निर्णायक वळण, उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य करत गावातील, नात्यातील व कुळातील लोकांना चौकशीनंतर  मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

उपसमितीच्या शिफारशी व आश्वासने :

हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी

मराठा कुणबी एकच असल्याच निर्णय घेण्यासाठी मुदत

गावातील, कुळातील, नात्यातील लोकांना चौकशीनंतर कुणबी जातीचे प्रमाणपत्र

सातारा गॅझेटवर जलदगतीने निर्णय

मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेणे

शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरीत संधी

बलिदान दिलेल्या कुटुंबांना १५ कोटींची मदत, आठवड्यात खात्यात जमा (Hyderabad Gazette Approved)

आंदोलन थांबवण्यासाठी निर्णायक पाऊल.

मनोज जरांगे पाटील याच्या शिफारशी मान्य झाल्यास तातडीने शासन निर्णय (GR) काढून अंमलबजावणी होणार, असा शब्द उपसमितीने मनोज जारांगे पाटील यांना दिला आहे. मराठा आरक्षण तोडगा काळण्यासाठी उपसमिती थेट आझाद मैदानावर येऊन जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचली. या समितीत उपस्सथित राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *